Winter Session
Winter Session

Winter Session : हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात हे अधिवेशन होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Winter Session ) आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी नागपुरात हे अधिवेशन होणार आहे. विरोधक सरकारला अनेक मुद्द्यांवरुन घेरण्याच्या तयारीत आहेत.

हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महसूल-वन विभागाकडून सर्वाधिक मागणी सादर करण्यात आली असून महसूल-वन विभागाकडून 15 हजार 721 कोटींची मागणी करण्यात आली. तर पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15 हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.

तसेच कृषिपंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग ग्राहकांसाठी 9 हजार 250 कोटींची मागणी आणि लाडक्या बहिणींसाठी 6 हजार 103 कोटींची मागणी केली असून एसटी महामंडळाच्या मदतीसह परिवहन विभागासाठी २००८ कोटींची तर कुंभमेळ्यासाठी ३ हजार कोटी रुपयांची मागणी सादर करण्यात आली आहे.

Summery

  • हिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

  • महसूल-वन विभागाकडून सर्वाधिक मागणी सादर

  • महसूल-वन विभागाकडून 15 हजार 721 कोटींची मागणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com