पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांची नाराजी; बॅनरवर भाजपच्या नेत्याचा फोटो नाही
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आज ,26 जुलैला वाढदिवस आहे. त्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी परळी शहरात कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. पण पंकजा मुंडेंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी छापण्यात आलेल्या बॅनरवर भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नाही. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.
पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. परळी शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, टॉवर चौक, उड्डाणपूल या ठिकाणी हे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांच्या पदाचा उल्लेख वगळता एकाही भाजपच्या बड्या नेत्याचा फोटो छापण्यात आलेला नाही. त्यामुळे जरी पंकजा मुंडे यांनी आपले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी मुंडे समर्थकांनी हे स्विकारलेले नाही. त्यामुळे आता बॅनरवरुन नवे राजकारण सुरु होण्याची शक्यता आहे