Supriya Sule : एअर इंडियाच्या विमानाला विलंब झाल्याने सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या...
(Supriya Sule ) एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर एअर इंडिया कडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. यातच काल दिवसभरात एअर इंडियाने 7 उड्डाणे रद्द केलीत. एअर इंडियाच्या विमानाला उड्डाणासाठी विलंब देखील होताना पाहायला मिळत आहे. याच विमानाच्या विलंबावरून प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील दिल्लीवरून पुण्यासाठी येणाऱ्या विमानाला तीन तासांहून अधिक विलंब झाल्याने पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. एअर इंडियाच्या विमानाच्या विलंबावरून संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'दिल्ली ते पुणे असा प्रवास एअर इंडियाच्या एआय 2971 या विमानाने करत आहे. विमानाला 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला आहे. मात्र याबाबत प्रवाशांना कोणताही संपर्क करण्यात आला नाही, कोणतीही अपडेट दिलेली नाही, मदत नाही, खूप वाईट सेवा आहे.'
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, 'एअर इंडियामध्ये असा विलंब आणि गैरव्यवस्थापन हे नेहमीचं झालं आहे. प्रवासी अडकले असून असहाय्य आहेत. ही उदासीनता अस्वीकार्य आहे.' असे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.