महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला?; सुरेखा पुणेकरांचा सवाल

महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार प्रवीण दरेकरांना कुणी दिला?; सुरेखा पुणेकरांचा सवाल

Published by :
Published on

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा 'रंगलेल्या गालाचा' मुका घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती. सुप्रसिद्ध लोक कलावंत सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशापुर्वी त्यांनी हे विधान केल्याने मोठा वाद झाला होता. या प्रकरणावरून अनेक ठीकाणी आंदोलनेही झाली होती. आता या प्रकरणावर थेट सुरेखा पुणेकर यांनी आक्रमक भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष नाही तर महिलांचा आदर करणारा पक्ष असल्याचे त्यांनी म्हटलंय. त्यामुळेच आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचं सुरेखा पुणेकर यांनी सांगितलं. तसेच प्रवीण दरेकरांना महिलांचा सन्मान करता येत नसेल तर करु नका. मात्र महिलांची अवहेलना करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा सवाल सुरेखा पुणेकर यांनी विचारला आहे. प्रवीण दरेकरांनी माफी मागावी, त्याशिवाय महिला शांत बसणार नाहीत, असा इशाराही सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे.

चित्रपटातील लोक राजकारणात जातात. लावणीतील लोक जाऊ शकत नाहीत का? असा सवालही त्यांनी विरोधकांना विचारला आहे. दरम्यान सुरेखा पुणेकर उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com