सुषमा अंधारे यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाल्या...

सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, इलेक्टोरल बाँड असेल किंवा इथलं जे वेगवेगळं आतापर्यंतचं स्कॅम आहेत. या सगळ्या स्कॅमवर मोदीजींनी अजूनही नीटशी समाधानकारक उत्तर दिलेली नाहीत.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, इलेक्टोरल बाँड सारखा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्या भाजपाने केला त्याच घोटाळ्यातून आलेल्या पैशात आमदार - खासदारांची जी खरेदी - विक्री चालू आहे. ही खरेदी - विक्री महाराष्ट्राची जनता आणि भारतही अजिबात सहन करणार नाही. तो त्याची उत्तरे देईल. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com