Lokshahi Marathi Cross Fire With Sushma Andhare: 'मुंबईचा एकएक उद्योग महाराष्ट्राबाहेर पाठवण्याचं पाप केलं..', अंधारेंचा भाजपवर टीका
सध्या राज्यात महापालिका निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्ष वेगवेगळ्या आश्वासनांसह 29 महापालिकांतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे आणि पक्षांच्या बदलत्या भूमिकांमुळे मतदारांना धोरणे समजायला गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘लोकशाही मराठी’ या वृत्तवाहिनीवर दिलेल्या सविस्तर मुलाखतीत सुषमा अंधारे काय म्हणाल्या ते वाचा सविस्तर.
मला आनंद आहे की त्यांचा आमच्यावर रोश आहे. त्यांचा आमच्यावर रोश आहे याचा अर्थ ते जे ऐरवी म्हणत होते की आता ही शिल्लक सेना आहे, तर त्यांच्या लक्षात आलं की हा शिल्लक सेना नाही हे आपल्याला औषधालाही शिल्लक ठेवणार नाही इतक्या ताकदीने अजूनही लढत आहेत. ते रोश व्यक्त करत आहेत याचा अर्थ ते आम्हाला त्यांचा सगळ्यात मजबूत स्पर्धक किंबहूना मोठं आवाहन समजत आहेत असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
25 वर्षाचा हिशोब?
मी आपल्याला सांगितले पाहिजे की यै 25 मधली साधारण 15 ते 18 वर्ष तेच तर आमच्या सोबत होते. त्यामुळे त्या 15-18 वर्षाचं जे काही अकाऊंट टॅली होईल त्या अकाउंट टॅलीमध्ये प्रोफिट किंवा लॉसचे भागिदार तेही असतील हा एक भाग आहे. आता आम्ही काय केलं? असा प्रश्न त्यानी विचारावा का? ज्यांनी या मुंबईचा जी मुंबई आपण सगळ्यांनी निढळेच्या घामाने मुंबई उभी केली त्या मुंबईचा टीडीआर अदानींकडून घ्यायचा असं रिझोल्यूशन जे लोक करतात आम्ही त्यांना हिशोब द्यायचा? मुंबईचा एकएक उद्योग महाराष्ट्राबाहेर पाठवण्याचं पाप केलं खरंच त्यांना तो नैतिक अधिकार उरतो का? सुषमा अंधारेंनी भाजपावर अशी टीका केली.
