Jalna : जालन्यात बोगस मतदान केल्याचा संशय; संशयित बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jalna) 29 महानगरपालिकांमध्ये आज मतदान होणार आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानाला सुरूवात झाली असून अनेक मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता जालन्यात बोगस मतदान केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संशयित बोगस मतदारांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पाहायला मिळत असून मतदाराने दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 9 मध्ये ही घटना घडली असून संशयित बोगस मतदाराची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
Summary
जालन्यात बोगस मतदान केल्याचा संशय
संशयित बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात
मतदाराने दुसऱ्या नावावर मतदान केल्याचा आरोप
