रामटेक मतदारसंघातील 'या' 6 काँग्रेस पदाधिकाऱ्याचं निलंबन

रामटेक मतदारसंघातील 'या' 6 काँग्रेस पदाधिकाऱ्याचं निलंबन

रामटेक मतदारसंघातील 6 काँग्रेस पदाधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ज्ञानेश्वर पवार, नागपूर

रामटेक मतदारसंघातील 6 काँग्रेस पदाधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेत पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. राजू पारवे यांना मदत केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभेत काँग्रेस सोडून लोकसभा लढवणारे माजी आमदार राजू पारवे यांना मदत केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये कुही शहर काँगेस कमिटी अध्यक्ष विलास राघोर्ते, कुही नगर परिषद अध्यक्ष हर्षा इंदापूरकर, नगरसेवक सुपेश मेश्राम, निशा घुमरे, अमित ठवकर आणि मयूर तळेकर यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com