माया वाघीण अजुनही बेपत्ताच! ताडोबाच्या राणीसाठी वन्यजिव प्रेमींचे "सर्च माया" आंदोलन

माया वाघीण अजुनही बेपत्ताच! ताडोबाच्या राणीसाठी वन्यजिव प्रेमींचे "सर्च माया" आंदोलन

सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेली ‘माया’ बेपत्ता, वाघिणीला शोधण्यासाठी ताडोबा प्रशासनाचे प्रयत्न सुरु
Published by :
shweta walge

चंद्रपुर :- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना झलक दाखवणारी ताडोबाची राणी माया वाघीण अजुनही बेपत्ताच असल्याने वन्यप्रेमीमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. ताडोबात अधिराज्य गाजवणारी व पर्यटकांच्या गळ्यातील ताईत असणारी माया वाघीण दोन महिन्यापासून कोणत्याही पर्यटक व वनविभागाच्या नजरेस पडली नाही. माया वाघीणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन व ट्रॅप कॅमेराचा माग घेतला तरी पण वनविभागाला यश मिळाले नाही. ताडोबातील कर्मचारी व अधिकारी मायाच्या शोधासाठी परिश्रम घेत आहेत.

मायाच्या टेरेटरीमध्ये सध्या छोटी तारा व रोमा ह्या दोन वाघीणी दिसत आहे. तिने आपला अधिवास बदलविल्याची वनविभागाने शक्यता वर्तवली. पण दोन महिन्यापासून कुणाच्याही नजरेस वाघीण न आल्याने बेपत्ता की घातपात ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने "वाघ वाचवा जंगल वाचवा' या शासणाच्या मोहीमेला धक्का बसला आहे. यासाठी चिमुर तालुक्यातील वन्यजिवप्रेमी यांनी कवडू लोहकरे यांच्या नेतृत्वात माया वाघीणीचा शोध घेण्यासाठी" सर्च माया" आंदोलन करण्यात आले.

माया ही वाघीण अतिशय धीट असून जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. माया सध्या 13 वर्षांची आहे. माया वाघिणीचा माग काढण्यासाठी सध्या 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहे. मात्र माया वाघिणीचा अधिवास असलेल्या पांढरपौनी भागात सध्या खूप पाणी असल्याने आणि या वाघिणीचा जुना अनुभव बघता या भागात Foot पेट्रोलिंग शक्य नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com