Taiwan Earthquake
महाराष्ट्र
Taiwan Earthquake : तैवान भूकंपाने हादरलं ; 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप
तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Taiwan Earthquake) तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले असून तैतुंग काउंटीमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे.
तैवानच्या आग्नेय किनाऱ्यावर असलेल्या तैतुंग काउंटीमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. पहिला धक्का ५.७ तीव्रतेचा असल्याची माहिती मिळत असून लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.1 एढी मोजली गेली असून या धक्क्यांनी मोठ-मोठ्या इमारतीही हादरल्या.
भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून केवळ 10 किलोमीटर खाली होता.वेगवेगळ्या तीव्रतेचे दोन भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे.
Summary
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के
तैतुंग काउंटीमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप
समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा व्हिडीओ
