तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत दुजाभाव; भाजपाचा गंभीर आरोप

तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत दुजाभाव; भाजपाचा गंभीर आरोप

Published by :
Published on

समीर महाडेश्वर | तौक्ते चक्रीवादळात झालेलय़ा नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत वाटप करण्यात आली आहे. माञ या नुकसान भरपाईत आता दुजाभाव झाल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यासोबत संबंधितांचे फेरपंचनामे करा आणि त्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात झालेल्या तौक्ते वादळामुळे मच्छिमारांना देखील मोठा फटका बसला आहे. येथील नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून मदत वाटप करण्यात येत आहे. मात्र नुकसान भरपाई वाटपात पक्षपात झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. काही विशिष्ट व्यक्तींना ही मदत मिळवून देताना खऱ्या लाभार्थ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी केला आहे. तसेच दत्ता सामंत यांनी जवळपास ४०० लाभार्थ्यांची यादी शिष्टमंडळाने मत्स्य आयुक्त कार्यालय तसेच मालवण तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सादर केली. यावेळी ज्यांची खरीच नुकसान झाले आहे, त्यांना मदत मिळालीच पाहिजे असे म्हणत, संबंधितांचे फेरपंचनामे करा आणि त्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com