Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेचा टिझर लाँच; 90 ठिकाणी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Devendra Fadnavis) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेचा टीझर लाँच करण्यात आला आहे.
90 ठिकाणी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महापौर हा भाजपचाच होणार टीझर मध्ये फडणवीस यांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे.
Summary
छत्रपती संभाजीनगरमधील फडणवीस यांच्या सभेचा टिझर लाँच
90 ठिकाणी एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सभा जनतेपर्यंत पोहोचवली जाणार
महापौर हा भाजपचाच होणार टीझर मध्ये फडणवीस यांचं वक्तव्य
