Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीझर जारी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली.
याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत होणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाणार असून ठाकरे बंधूंची एकत्रित ही पहिलीच मुलाखत असणार आहे.
खासदार संजय राऊत ठाकरे आणि महेश मांजरेकर ठाकरे बंधूंची मुलाखत घेणार असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीचा टीझर जारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
ठाकरे बंधूंची विशेष मुलाखतीचा टीझर जारी
संजय राऊत, दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत
ठाकरे बंधू यांची पहिली संयुक्त मुलाखत
