Amravati
Amravati

Amravati : अमरावतीत EVM मध्ये तांत्रिक बिघाड; मतदार मतदान केंद्राच्या बाहेर उभे

महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Amravati) राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये मतदान आज होणार आहे.

सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून असून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. उद्या 16 तारखेला मतमोजणी पार पडणार आहे.

यातच आता मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला सुरुवात झाली असतानाच आता अमरावतीत EVM मशीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र 23 येथील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाला असून पंधरा मिनिटांपासून मशीन बंद असल्याने मतदार मतदान केंद्राच्या बाहेर उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.

Summary

  • अमरावतीत EVM मध्ये तांत्रिक बिघाड

  • गर्ल्स हायस्कूलमधील मतदान केंद्रावरील प्रकार

  • मतदान केंद्र 23मधील EVMमशीनमध्ये तांत्रिक बिघाड

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com