Tejasvee Ghosalkar : तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये प्रवेश, म्हणाल्या...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Tejasvee Ghosalkar) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश ठाकरेसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे, तर भाजपला त्याचा राजकीय फायदा होण्याची चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष प्रवेश करायच्याआधी तेजस्वी घोसाळकर यांनी पोस्ट शेअर केली होती. हा पक्षप्रवेश झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद झाला.
यावेळी तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, "हा निर्णय खूप कठीण आहे. खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही. खूप काही गोष्टी आहेत बोलायच्या पण माहित नाही कसं बोलू? मला विकासाची कामं करायची आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माझी सर्व कामं होतील. अशी मी अपेक्षा करते. अभिषेकची जी हत्या झालेली आहे. त्याचा जो संथगतीने तपास चालू आहे तोसुद्धा लवकर होईल. माझ्या घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. ते जे काम मला देतील ते मी जसे शिवसेनेत असताना करत होते त्याचप्रमाणे त्याच्याहून जास्त मी भाजपमध्ये काम करेन." असे तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या.
Summery
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का
तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
भाजप प्रवेश झाल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी दिली प्रतिक्रिया
