Tejasvee Ghosalkar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? तेजस्वी घोसाळकरांचा आज भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Tejasvee Ghosalkar) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरेसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हा प्रवेश झाला तर ठाकरेसेनेसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे, तर भाजपला त्याचा राजकीय फायदा होण्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत त्या आज भाजमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास दादरच्या वसंतस्मृतीमध्ये तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Summery
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का
ठाकरे गटातील माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपच्या वाटेवर
आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता
