Maharashtra Cold Wave : महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Maharashtra Cold Wave ) राज्यात थंडीची चाहूल लागली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवू लागली आहे. धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत आहे. अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा घसरलेला आहे.
महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला असून राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. यातच आता मुंबईत आजपासून पुन्हा गारठा जाणवणार आहे. मुंबईतील हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवू लागले असून गेल्या काही दिवसांपासून उष्णता जाणवत होती मात्र आजपासून पुन्हा एकदा गारठा जाणवू लागला आहे.
पहाटेच्या सुमारास कोकणात गारवा अधिक जाणवत आहे. तसेच आज मुंबई विभागात तापमानात हलकी घट नोंदवली गेली असून पहाटे हवेत गारवा निर्माण झाला होता. मुंबईमध्ये किमान तापमान साधारण 18–19 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून हवेतला उकाडा कमी झाला असून आता थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे.
Summery
राज्यातील हवामानात बदल
महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला
राज्यात पुन्हा गारठा वाढला
