Heat Wave
Heat Wave

Heat Wave : राज्यात पुन्हा उकाड्याचा जोर; तापमान वाढीचा अंदाज

काही दिवस उकाडा सहन करावा लागणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे

  • मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज

  • काही दिवस उकाडा सहन करावा लागणार

(Heat Wave) राज्यात पावासाने विश्रांती घेतली असतानाच आता उकाड्याचा जोर वाढला आहे. पुढील एक-दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता असून तापलेल्या वातावरणामुळे शुक्रवारी मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली. मागील काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे.

साधारण ३४ ते ३५ अंशादरम्यान तापमान नोंदवले जात आहे. तापमानातील ही वाढ पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com