Jalna Accident
(Jalna Accident) जालन्यात भीषण अपघात झाला आहे. जालन्यात मालवाहू ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत रिक्षा मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
जालना - राजूर रोडवरील राजुर चौफुली परिसरात ही घटना घडली असून हे तिघे जण रिक्षाने जालन्याहून बदनापूर तालुक्यातील मांडवा गावाकडे निघाले होते. यादरम्यान जालन्याच्या राजुर चौफुली येथे त्यांच्या रिक्षाला मालवाहू ट्रक ने जोराने धडक दिली.
या धडकेत रिक्षा मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या घटनेनंतर फरार झालेल्या ट्रक चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.