Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Accident) सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पाटोळे येथे कारचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत असून या अपघातात 3 जणांना मृत्यू झाला आहे.
बहीण भावासह, भावाच्या पत्नीचा मृत्यू तर लहान मुलं जखमी झाली असल्याची माहिती मिळत आहे. दोघे कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरातील रहिवाशी होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी आणि समृद्धी महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांना समृद्धी महामार्गावर धाव घेतली.
मदतकार्य सुरु करण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जण विवाह सोहळ्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.
Summery
कल्याण मध्ये राहणाऱ्या कुटुंबावर काळाचा घात
सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर पाटोळे येथे कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात
बहीण भावासह, भावाच्या पत्नीचा मृत्यू तर लहान मुलं जखमी
