Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray : मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार...

ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Raj Thackeray) ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा झाली. अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज अखेर ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. यावेळी राज ठाकरे यांनी संवाद साधला.

राज ठाकरे म्हणाले की, "जे काही बाकी बोलायचे आहे ते जाहीर सभेतून बोलू. माझी मुलाखत झाली होती. मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होते की, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरूवात त्या वाक्यापासून झाली."

"महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवणाऱ्या खूप टोळ्या फिरत आहेत. त्याच्यामध्ये दोन टोळ्या सामील झाल्या आहेत. ते राजकीय पक्षामधील मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. बरेच दिवस ज्याची प्रतिक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करत आहोत. यासोबतच ते पुढे म्हणाले की, मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार." असं देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray
Thackeray Bandhu Yuti Exclusive : अखेर ठाकरे बंधूंची युती झालीच

Summary

  • ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा झाली

  • राज ठाकरे यांनी संवाद साधला

  • "मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com