Uddhav Thackeray - Eknath Shinde: कणकवलीत ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार ? पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्रित बैठक

शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बैठक झाल्याची माहिती
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युती होणार ?

  • शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत बैठक झाल्याची माहिती

  • सिंधुदुर्गात भाजपचा स्वबळाचा नारा

(Uddhav Thackeray - Eknath Shinde) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूकीत नितेश राणेंना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सोबत आघाडी करून शिंदेची शिवसेना कडवे आव्हान उभे करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काल महाविकास आघाडी व विविध संघटनासोबत शिंदेच्या शिवसेनेची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. कणकवली शहरात याबाबत गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळत. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com