Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Chandrashekhar Bawankule) ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे. आज दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची पत्रकार परिषदेत घोषणा होईल. घोषणा करण्याच्या आधी ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एकत्र येऊन अभिवादन करणार असून या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही बंधू काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज मुंबईच्या विकासाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "भाजपवर काही फरक पडत नाही. जनता यांच्यापासून आता दूर गेली आहे. जनतेला नौटंकी कळलेली आहे. किती भाषणातून नौटंकी करतील तरी काही होणार नाही. फक्त आता विकासाचेच व्हिजन मांडावं लागेल."

"कोणी कितीही एकत्र येऊ दे काही होणार नाही. महायुती जिंकेल. या महायुतीमधले सर्वच मराठी आहेत. भाषणाने मत मिळणार नाहीत मत व्हिजनने मिळतील." असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Summary

  • ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा

  • चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

  • " कोणी कितीही एकत्र येऊ दे काही होणार नाही, महायुती जिंकेल"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com