Sanjay Raut : "दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे..."; संजय राऊत म्हणाले...
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut) ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार आहे. काल संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली. आज दुपारी 12 वाजता ब्ल्यू सी हॉटेलमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची पत्रकार परिषदेत घोषणा होईल. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत.
घोषणा करण्याच्या आधी ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एकत्र येऊन अभिवादन करणार असून या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही बंधू काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज मुंबईच्या विकासाचा जाहीरनामा देखील प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी अत्यंत मंगलमय आहे. कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. दोन ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे त्यांच्या पोटामध्ये भितीचा जो गोळा आलेला आहे. तो भितीचा गोळा त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो आहे. मराठी माणूस एक आहे आणि एक राहील. मराठी माणसांचं नेतृत्व उद्धवजी आणि राजजी करतील. आज त्यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल."
" मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच तिथे आमची जागा वाटपासंदर्भातील चर्चा संपलेली आहे. याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो आहोत. युती आणि आघाडीमध्ये प्रत्येकाच्या मनासारखे होत नाही, काही ठिकाणी त्याग करावा लागतो. माणसांच्या प्रेमात न पडता जागावाटप करायचे असते." असे संजय राऊत म्हणाले.
Summary
ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
"आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा"
