Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये आज पहिली संयुक्त सभा; कुणावर साधणार निशाणा?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांच्या तोफा धडाडणार आहेत. आज नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा होणार असून नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची सभा होणार आहे.
संध्याकाळी 6 वाजता ही सभा होणार असून या सभेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. या सभेतून ठाकरे बंधू कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यासोबतच 10 तारखेला उद्धव ठाकरे यांची संभाजीनगरला सभा होणार असून 11 तारखेला राज आणि उद्धव यांची शिवतीर्थ येथे एकत्रित सभा पार पडणार आहे.
Summary
ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये आज पहिली संयुक्त सभा
नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरे बंधूंची सभा
ठाकरी तोफ कुणावर धडाडणार? याकडे नजरा
