Thackeray Brothers : मतदान चोरी होऊ न देण्यासाठी ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग; मतदान केंद्राच्या बाहेर उभा करणार 'भगवा गार्ड'
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.
सभांचा धडाका सुरू असल्याचे पाहायला मिळत असून आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर मतचोरीचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. याच पार्श्वभूमीवर आता मतदान चोरी होऊ न देण्यासाठी ठाकरे बंधूंकडून नवा प्रयोग करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.
या दोन्ही पक्षांकडून मतदानाच्या दिवशी 15 जानेवारीला मतदान केंद्रांबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या गार्डची गैरप्रकारांवर करडी नजर असणार आहे. मतचोरी, दुबार मतदार, बोगस मतदान हे गैरप्रकार टाळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Summary
मतदान चोरी होऊ न देण्यासाठी ठाकरे बंधूंचा नवा प्रयोग
मतदान केंद्राच्या बाहेर उभा करणार 'भगवा गार्ड'
15 जानेवारीला मतदान केंद्राबाहेर 'भगवा गार्ड'
