Thackeray Brothers : 'या' तारखेपासून ठाकरे बंधूंच्या सभा आणि रॅलीला होणार सुरूवात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Thackeray Brothers) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. यातच आता मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक बैठका घेण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची लगबग पाहायला मिळत असून 3 जानेवारी पासून सभा रॅलीला ठाकरे बंधूंकडून सुरुवात करण्यात येणार आहे. कोणत्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईकरांना आवाहन करणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची लगबग
3 जानेवारीपासून सभा, रॅलीला होणार सुरुवात
कोणत्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईकरांना आवाहन करणार
