Thackeray Brothers
Thackeray Brothers

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची रणनिती ठरली; दोघांमध्ये चार तास झालेल्या बैठकीत वचन नामा, सभा, प्रचार गीतांबाबत चर्चा

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Thackeray Brothers) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाच तारखेपासून संयुक्त सभा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची बैठक पार पडली. जवळपास साडेचार तास सुरू ही बैठक सुरू असून या बैठकीत वचननामा, सभा, प्रचारगीतांबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

तसेच बंडखोरी समावण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे यावर देखील सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. यासोबतच कोणत्या ठिकाणी दोघांच्या संयुक्त सभा घ्यायच्या आणि कोणत्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा घ्यायच्या, मुंबईसाठी कसा वचन नामा असणार यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com