Thackeray Brothers : मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात; उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers ) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. काल नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा पार पडली. आता उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे.
ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली राजकीय सभा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर होणार असून पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही सभा होणार असून या सभेतून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
Summary
मनपा निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र मैदानात
उद्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची सभा
रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार सभा

