Thackeray Brothers : राज, उद्धव ठाकरेंची 'या' तारखेला एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात तोफ धडाडणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thackeray Brothers) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
अनेक पक्ष जोरदार प्रचाराला लागले असून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांच्या तोफा धडाडणार आहेत. काल नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची पहिली सभा पार पडली.
आता 12 तारखेला राज आणि उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहे. गडकरी रंगायतन चौक येथे ही सभा पार पडणार असून शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधू काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summary
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले
12 तारखेला राज आणि उद्धव ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार
गडकरी रंगायतन चौक येथे ही सभा पार पडणार
