Latur team lokshahi
महाराष्ट्र
Latur : ऑटोरिक्षा क्रेनला लटकवून ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन
लातूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊद्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे.
सचिन अंकुलगे | लातूर : लातूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊद्या चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. ऑटो रिक्षा क्रेनला लटकवून रॅली काढण्यात आली होती. महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालकसेनेतील रिक्षामध्ये पुढील सीटवर प्रतिकात्मक मुख्यमंत्री व मागील सीटवर दोन उपमुख्यमंत्री बसवून सरकारचे लक्ष वेधून घेतले.
रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, ऑटो रिक्षाचे परमिट बंद झाले पाहिजे, राज्यातील कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या तसेच रिक्षावर झाड कोसळून अपघातामुळे मयत झालेल्या रिक्षा चालकाच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तीन चाकी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.