Uddhav Thackeray : आज होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा; आदित्य ठाकरे फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब
थोडक्यात
आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आहे
वरळी डोम येथे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा होईल
वोट चोरीच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंचे प्रेझेंटेशन असेल
(Uddhav Thackeray) आज सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोगस वोटिंगचा बॉम्ब फोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
दिल्लीत राहुल गांधी यांनी जसे बोगस वोटिंगबद्दल बोलताना जसे सादरीकरण केलं होते तशाप्रकारे आदित्य ठाकरे या मेळाव्यात सादरीकरण करणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होणार असून मुंबईच्या मतदार याद्यातील घोटाळा या सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करणार असून बोगस मतदान होऊ देऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याबद्दल देखील या मेळाव्यातून आदित्य ठाकरे सांगणार असल्याची माहिती मिळत आहे.
वरळी डोम येथे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा मेळावा होणार आहे. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे आता आदित्य ठाकरे या मेळाव्यातून नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
