Sanjay Raut : "ठाकरेंच्या युतीचा फरक नाही पडणार,मग प्रतिक्रिया का देतात", फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर राऊतांचा सवाल
Sanjay Raut Criticized Eknath Shinde: मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्र युती करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. इतर महापालिकांच्या युतींची घोषणा लवकरच होईल. या घडामोडींमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. युतीमुळे आता शिंदेसेना आणि भाजपविरोधात एक मोठा सामना होईल, असे चित्र निर्माण झाले आहे. आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलीच टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, "काहीही फरक पडणार नसेल तर रिएक्शन कसं करता देता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची दबडी वाजवता कशाला सगळेच. काल त्यांचे प्रवक्ते त्यांच्या फौज्या ही युती कशी अमुक आहे, प्रमुख आहे त्याची गरज नाही सोडून द्या. आपण 16 तारखेला भेटू ठाकरे बंधू मला सांगा भारतीय जनता पक्षाने आणि देवेंद्र फडणवीस त्याने मराठी माणसासाठी काय केलं एक गोपीनाथ राव मुंडे सोडले तर कधीही कोणीही अखंड महाराष्ट्र विषयी बोलले नाही. बेळगाव कारवार सीमा संदर्भात मराठी माणसावर होणारा अन्याय संदर्भात आवाज उठवला नाही गोपीनाथ मुंडे अपवाद आहे. बाकी मला सांगा कोणत्या मराठी माणसाने मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. बावनकुळे म्हणतात आम्ही वेगळा विदर्भ करू महाराष्ट्र तोडू बोलले ना, अधिवेशन काळात बोलले त्याच्यावरती ठाकरेच उभे राहिले कसा तोडतात, आम्ही बघतो मुख्यमंत्री उभे राहिले का मुख्यमंत्री यांचा कर्तव्य होतं. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बावनकुळे यांना जाब विचारण्याचा तुम्ही आम्हाला काय शिकवत आहात मराठी माणसाविषयीठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात बाळासाहेब ठाकरे होते. हे ठाकरे आहेत म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकड्यावरून एका लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हायला लागलं असतं. आम्ही ते होऊ देत नाही ही तुमची पोट दुखी आहे. आम्ही मुंबई वेगळी होऊ देत नाही ही त्यांची पोट दुखी आहे. मुंबईला महाराष्ट्रमध्ये अजून पर्यंत ठेवला आहे. संघर्ष करून ही तुमची पोटदुखी नाही तर तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं दाखवा दहा कामे दाखवा हे आम्ही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी केले."
यापुढे ते म्हणाले की, "गौतम अडाणी ला मुंबई विकणे हे मराठी माणसाचे काम नाही, गौतम अडाणी सारख्या मोदींच्या मित्राला अखिल मुंबई विकणे किंवा फुकटात घशात घालने हे मराठी माणसाची केलेली सेवा आहे का? आम्ही बघू दोन ठाकरे एकत्र आले आहेत भाऊ एकत्र आलेत दोन पक्ष एकत्र आले आहेत. तुम्ही तुमचे बघा आम्ही सत्तेसाठी एकत्र आले आहोत ठीक आहे, मग तुम्ही काय एकमेकाला चंपी मॉलिश करायला एकत्र आल्यात का रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर ते त्यांना मॉलिश करतात. मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात मग दोघे मिळून अजित पवार यांची चॅम्पियन करतात. तुम्ही एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात का? शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सवाल उपस्थितीत केला आहे."
ऑन मोदी
युपी मे ख्रिसमस बॅन केला तर, नरेंद्र मोदी चर्चमध्ये कसे गेले. नाताळ सणानिमित्त पंतप्रधान मोदींची दिल्लीतील चर्चमध्ये प्रार्थना… तर मोदी हिंदूंचे पोप.. संजय राऊतांनी टीका केली आहे.

