MNS- Shivsena UBT Morcha : ठाण्यात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा धडक मोर्चा; कारण काय?
थोडक्यात
ठाण्यात आज ठाकरेंची शिवसेना, मनसेचा मोर्चा
मोर्चाला दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते राहणार उपस्थित
ठाणे पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा
( MNS- Shivsena UBT Morcha) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने गेल्या काही दिवसांपासून भेटीगाठी होताना पाहायला मिळत आहे. यातच काल पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सहकुटुंब मातोश्रीवर पोहोचले. स्नेहभोजनासाठी राज ठाकरे मातोश्रीवर आल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पावणे तीन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती मिळालेली नाही.
यातच आता ठाण्यात आज ठाकरेंची शिवसेना, मनसेचा मोर्चा असणार आहे. मोर्चाला दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत असून ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार, वाहतुक कोंडी आणि पाणी प्रश्नावर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठाण्यात आज ठाकरे गट आणि मनसेचा एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून या मोर्चामध्ये आहे.आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) देखील पूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.