Thane Election 2026 : ठाण्याचा प्रवास आता एसी लोकलमध्ये होणार, पण तिकीट वाढणार नाही; देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा
महापालिका निवडणुकीमुळे राज्यभर तापलेल्या वातावरणात ठाणे-मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी बड्या नेत्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. आज (७ जानेवारी) ठाण्यातील ‘आपलं ठाणे आपला देवाभाऊ’ मुलाखतपर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्याच्या विकासकामांचा आराखडा मांडला. आगामी वर्षांत दळणवळण सुविधांचा विस्तार कसा होईल, याबाबत विस्तृत माहिती दिली. विशेष म्हणजे, सर्व लोकल ट्रेन एसी असतील तरी सेकंड क्लास तिकीट वाढणार नाही, अशी घोषणा केली.
फडणवीस म्हणाले, मुंबई आणि एमएमआरमधील राहणी आणि दळणवळणाचा प्रश्न सुटला तरच आम्ही यशस्वी. २०१४ नंतर आम्ही ४७५ किमी मेट्रो प्लॅनिंग केली आणि काम सुरू केलं. नंतर स्थगिती आली, पण शिंदे सरकारने पुन्हा सुरू केलं. आतापर्यंत २०० किमी पूर्ण, प्रत्येक वर्षी ५० किमी करून २०२८ पर्यंत ४०० किमी आणि २०३० पर्यंत संपूर्ण नेटवर्क तयार करू.
ठाण्याला मुंबई, कल्याण-भिवंडीशी कनेक्टिव्हिटी दिली असून, तीन-चार-पाच मेट्रो जोडल्या आहेत. ठाणे रिंग मेट्रोचा प्रस्ताव मंजूर झाला असून, ते पहिले शहर असेल जिथे पूर्ण रिंग मेट्रो येईल. लोकल ट्रेनांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, "लोकलला लटकून वर्षे काढली, पण मोदीजींच्या नेतृत्वात प्लॅटफॉर्म, स्टेशन सुधारले आणि स्वच्छता वाढली.