Crime News : 'मला गर्लफ्रेंडसोबत लग्न करायचे होते, पण तिची लहान बहीण तिचे भांडण लावत होती, म्हणून तिला....' फरार मुख्यध्यापकाच्या कबुली जबाब

Crime News : 'मला गर्लफ्रेंडसोबत लग्न करायचे होते, पण तिची लहान बहीण तिचे भांडण लावत होती, म्हणून तिला....' फरार मुख्यध्यापकाच्या कबुली जबाब

प्रेयसीशी लग्नात अडथळा येत असल्याच्या संशयातून तिच्या धाकट्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या करणारा आणि चार महिने फरार असलेला मुख्याध्यापक कुमुद उर्फ दीपक (40) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

प्रेयसीशी लग्नात अडथळा येत असल्याच्या संशयातून तिच्या धाकट्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या करणारा आणि चार महिने फरार असलेला मुख्याध्यापक कुमुद उर्फ दीपक (40) अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. त्याने अटकेनंतर पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार कुमुदचा प्रेयसीशी विवाहाचा हट्ट होता. मात्र तिची धाकटी बहीण गुडिया या नात्याला विरोध करत होती. त्यामुळे रागाच्या भरात कुमुदने 11 ऑगस्ट रोजी गुडियाला कोचिंगला जात असताना डोक्यात गोळी झाडून ठार मारले. हत्येनंतर तो प्रेयसीलादेखील मारण्याच्या विचारात होता, पण पकडले जाण्याच्या भीतीने घटनास्थळावरून पळून गेला.

गुन्ह्यानंतर आरोपी बिहारहून खगरियाला आणि नंतर गुवाहाटीला पळाला. तिथे केस-दाढी कापून त्याने रूप बदलले आणि ज्योतीनगर आरपीएफ कॉलनी रोडवर घर भाड्याने घेतले. घरमालकाने वारंवार ओळखपत्र मागितले तरी कुमुद टाळाटाळ करत होता. संशय आल्याने घरमालकाने पोलिसांना माहिती दिली. तपासात त्याची खरी ओळख उघड झाली.

समस्तीपूर पोलिसांनी 10 दिवस गुवाहाटीत राहून शोधमोहीम राबवली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली. बुधवारी त्याला समस्तीपूरला आणून तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्याला रिमांडवर घेतले जाणार आहे.

गुडिया ही विनय कुमार यांची मुलगी असून डी.एल.एड.ची तयारी करत होती. तिच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांनी आरोपी शिकवत असलेल्या बहेरी येथील खासगी शाळेला आग लावली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com