11 ते 14 एप्रिल दरम्यान होणार लसमहोत्सव

11 ते 14 एप्रिल दरम्यान होणार लसमहोत्सव

Published by :
Published on

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. कोरोनाचा फैलाव युद्धपातळीवर' रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केले. यासोबतच पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान 'लस महोत्सव' आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याची आवश्यकता आहे', असे पंतप्रधानांनी सांगितले. ४५ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. असेही ते म्हणाले. ११ एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिलला आहे. त्यानिमित्त लसीकरण महोत्सवाची घोषणा पंतप्रधानांनी केली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com