11th admission : अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 'या' तारखेला जाहीर होणार

11th admission : अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 'या' तारखेला जाहीर होणार

तांत्रिक अडचणींमुळे गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेली अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(11th admission ) तांत्रिक अडचणींमुळे गेल्या दीड महिन्यांपासून रखडलेली अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 26 जून रोजी ही यादी जाहीर होणार होती मात्र काही तांत्रिक बाबींमुळे ही यादी जाहीर झाली नाही. आता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिली आहे.

यंदा शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा खूप लवकर घेतल्या आणि 13 मे रोजी निकालही जाहीर केले त्यानंतर 19 मेपासून विद्यार्थ्यांसाठी अकरावी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा झाली. यावर्षी राज्यभरात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून सर्व प्रक्रिया होऊन 21 मेपासून प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.

त्यामुळे निकाल लागूनही गेले दीड महिना विद्यार्थी केवळ अकरावीच्या प्रवेशासाठी ताटकळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ऑनलाइन अर्ज भरताना आणि वेबसाईट चालवताना विद्यार्थ्यांना असंख्य अडचणी येतच होत्या मात्र त्यानंतरही आता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्यासही विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने 30 जून रोजी अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com