झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा; उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी उत्तर देईन म्हटल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा; उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी उत्तर देईन म्हटल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया

Published by :
Published on

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच ओमायक्रॉनचे संकट आलं आहे. लॉकडाऊन लागण्याची भिती देखिल आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधक टिका करत आहेत. उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तवअधिवेशनातही अनुपस्थित असल्याने त्यांच्यावर टिका होत आहे. या होत असलेल्या टिकेवर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रीया दिली आहे

मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडलेल्या या बैठकीत ते बोलत असताना ते म्हणाले की, प्रतिक्रीया देताना म्हणाले की, आपल्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतो, ज्याला दाखवायचं आहे त्याला त्याचवेळी मी करुन दाखवतो असं म्हटलं आहे. "माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा," अशा सूचना उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर आता अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे की, "ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो" म्हणजे टीकाकारांचे टक्कल करणे, डोळा फोडणे, खटला भरणे हेच ना? झेपत असेल तर थोडं काम करून दाखवा असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com