Mahayuti
महाराष्ट्र
Mahayuti : महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरला; वरळी डोममधून 'या'तारखेला पहिली जाहीर सभा होणार
आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Mahayuti ) आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे.
2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरला आहे. वरळी डोममधून 3 तारखेला महापालिकेचं रणशिंग फुंकण्यात येणार असून वरळी डोमला महायुतीची पहिली जाहीर सभा होणार आहे.
संध्याकाळी 6 वाजता वरळी डोमला महायुतीची पहिली सभा होणार असून शिंदे-फडणवीसांसह प्रमुख नेते हा सभेला उपस्थित राहणार आहेत.
Summary
महायुतीच्या पहिल्या जाहीर सभेचा मुहूर्त ठरला
वरळी डोममधून 3 तारखेला फुंकणार महापालिकेचं रणशिंग
वरळी डोमला महायुतीची पहिली जाहीर सभा होणार
