पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचे सर्वेक्षण; नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

पहिली पास व्यक्ती करतोय आरक्षणाचे सर्वेक्षण; नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण केलं जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण केलं जात आहे. तर हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारचा 31 जानेवारीपर्यंतचा प्रयत्न आहे. या मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सर्वच जिल्ह्यात वेग आला आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान अपबाबत तक्रारी आल्या आहेत. सर्वेक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एप्लीकेशनमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी आल्याचे पाहायला मिळाले.

यातच आता अजून एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे सर्वेक्षणासाठी पहिली पास चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com