Devendra Fadnavis On Konkan Railway
: मुख्यमंत्र्यांकडून चाकरमान्यांसाठी खूशखबर! आता गणपतीला कोकणात जाण आणखी सोप; पण कसं?

Devendra Fadnavis On Konkan Railway : मुख्यमंत्र्यांकडून चाकरमान्यांसाठी खूशखबर! आता गणपतीला कोकणात जाण आणखी सोप; पण कसं?

गणेशभक्तांच्या सेवेत असलेली गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस 367 अधिक रेल्वे फेऱ्यांसह सोडण्यात येणार आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

कोकणात जाण्यासाठी ट्रेन आणि बसचे बुकिंग पूर्ण क्षमतेने भरल्याने चाकरमान्यांची चिंता वाढली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलासा देत सांगितले की, यंदा मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 367 अधिक रेल्वे फेऱ्या सोडण्याची योजना आखण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत पत्राद्वारे माहिती दिली असून, “या उपक्रमामुळे कोकणवासीयांना मोठी मदत होणार आहे,” असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी चाकरमान्यांसाठी खास उपक्रम जाहीर केला आहे. गेल्या 12 वर्षांपासून गणेशभक्तांच्या सेवेत असलेली गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस यंदा दोन विशेष गाड्यांसह चालवली जाणार आहे. प्रवाशांना मोफत जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

23 ऑगस्ट 2025 : दादर (प्लॅटफॉर्म क्र. 14) सकाळी 11 वाजता सुटणारी गाडी → रत्नागिरी, कुडाळमार्गे सावंतवाडी

24 ऑगस्ट 2025: दादर (प्लॅटफॉर्म क्र. 14) सकाळी 11 वाजता सुटणारी गाडी → वैभववाडी, कणकवलीमार्गे अंतिम स्थानक

तिकीट वाटप 18 ऑगस्टपासून मंडळ अध्यक्षांमार्फत सुरू होणार आहे. अतिरिक्त फेऱ्या आणि डबल धमाका मोदी एक्स्प्रेस यांच्या जोरावर यंदाचा गणेशोत्सव कोकण प्रवाशांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com