मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास होणार अधिक थंडगार; लोकलच्या जागी 10 नवीन ‘एसी’ लोकल धावणार
Central Railway AC Local: मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास अधिक थंडगार करण्यासाठी वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 6 नोव्हेंबरपासून सामान्य लोकलच्या जागी 10 नवीन वातानुकूलित लोकल सेवा धावणार आहेत. 10 फेऱ्यांपैकी गर्दीच्या वेळी दोन फेऱ्या धावतील.
मध्य रेल्वे 6 नोव्हेंबर 2023 पासून सामान्य (नॉन-एसी) सेवा बदलून आणखी 10 वातानुकूलित लोकल सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकल सेवेची एकूण संख्या दररोज 66 इतकी होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी सेवांची संख्या 1810 राहणार आहे. या 10 सेवांपैकी एक एसी लोकलही सकाळी आणि एक संध्याकाळी गर्दीच्या वेळी धावणार आहे. या वातानुकूलित लोकल सोमवार ते शनिवार या कालावधीत धावणार आहे. रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी या एसी लोकल धावणार नसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
नवीन 10 वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक
सकाळी 7:16 वाजता कल्याण ते सीएसएमटी
सकाळी 8:49 सीएसएमटी ते कल्याण
सकाळी 10:25 वाजता कल्याण ते सीएसएमटी
सकाळी 11:58 वाजता सीएसएमटी ते अंबरनाथ
दुपारी 2 वाजता अंबरनाथ ते सीएसएमटी
सायंकाळी 4:01 वाजता सीएसएमटी ते डोंबिवली
सायंकाळी 5:32 वाजता डोंबिवली ते सीएसएमटी
सायंकाळी 6:40 परळ ते कल्याण
रात्री 8:10 कल्याण ते परळ
रात्री 9:39 वाजता परळ ते कल्याण