Maharashtra Assembly Monsoon Session
Maharashtra Assembly Monsoon Session

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत, विविध मुद्द्यांवर चर्चा

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Maharashtra Assembly Monsoon Session) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 30 जूनला सुरु झाले असून 18 जुलैपर्यंत असणार आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून शेवटच्या आठवड्यातही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत.
 

पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असून विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत, आज अधिवेशनात मुंब्रा येथे घडलेल्या लोकल ट्रेन अपघाताबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांचे होणारे हाल तसेच अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करण्याबाबत मागणी करण्यात येणार आहे.

तसेच राज्यातील पायाभूत सुविधा विकास कामे निकृष्ट रस्त्यांचे काम तसेच विकास कामादरम्यान होणारा भ्रष्टाचार या मुद्द्यावरही चर्चा होणार असून त्या त्या विभागाच्या मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे. राज्यात गेल्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान तसेच रस्त्यांचे देखील नुकसान झाले आहे याबद्दल आमदार विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित करणार आहेत. 

अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे मात्र शेवटचे काही दिवस राहिले असून विरोधी पक्षनेते पदाची निवड अद्याप झालेली नाही, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते संदर्भात अंबादास दानवे यांचा देखील कार्यकाळ संपत आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com