दिल्लीत राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, बैठकीत आगामी निवडणुकीबाबत होणार चर्चा

दिल्लीत राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक, बैठकीत आगामी निवडणुकीबाबत होणार चर्चा

Published by :

महाराष्ट्रातील महाविका आघाडीतील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वेगवेगळ्या बैठका आज होत. एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत हे आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधींना भेटणार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी पक्षाची महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. संजय राऊत हे आज संध्याकाळी ५ वाजता राहुल गांधींना भेटणार असल्याचं बोललं जातंय. तर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहे. यामुळे संजय राऊत आणि प्रियांका गांधींची आज भेट होण्याची शक्यता कमी आहे. संजय राऊत हे प्रियांका गांधींना उद्या भेटणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, गोव्यासह ५ राज्यांच्या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना मोठा निर्णय घेण्याच्या विचार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेत असलेली शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यूपीएत सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्त प्रदेशातील विधानसभा निवडणूक शिवसेना काँग्रेससोबत लढेल, असं बोललं जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com