Santosh Deshmukh Case
महाराष्ट्र
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर आरोपींवर दोष निश्चित; पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली.
बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Santosh Deshmukh Case ) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी पार पडली. हत्या प्रकरणी अखेर आरोपींवर दोष निश्चिती झाली असल्याची विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली आहे.
दोष निश्चितीचा आराखडा न्यायालयाने वाचून दाखवला असून या प्रकरणावर आता पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे.
Summary
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी
हत्या प्रकरणी अखेर आरोपींवर दोष निश्चिती
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती
