दोन मोठ्या कंपन्यांना गंडा घालणाऱ्या इंजिनिअर टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

दोन मोठ्या कंपन्यांना गंडा घालणाऱ्या इंजिनिअर टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेडय़ा

पोलिसांनी टोळीकडून लाखोचा ऐवज केला हस्तगत

अमझद खान | कल्याण : बनावट आधार कार्डाच्या सहाय्याने सीम कार्ड मिळवायचे. त्या सीमकार्डच्या सहाय्याने अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांमधून महागड्य़ा ऑनलाईन वस्तू मागवायचे. मागविलेल्या वस्तू आल्या की, पार्सल बॉयला बतावणी करुन त्याने आणलेल्या पार्सलमध्ये दुसरी वस्तू टाकून परत करायचे असे करून पाच जणांच्या टोळी देशभरातील अनेक राज्यात या दोन कंपन्यांना गंडा घातला आहे. अखेर या टोळीस डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अटक करुन मोठी कामगिरी केली आहे. या टोळीचा म्होरक्या इंजिनिअर आहे.

कल्याण-डोंबिवलीत डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम डिटेक्शन 8 टक्क्यांवर पोहचले आहे. त्याचाच परिमाण आहे की देशभरात गंडा घालणाऱ्या टोळीच्या पाच जणांना मानपाडा पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे. डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुऱ्हाडे आणि मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

टोळीचा म्होरक्या रॉबीन आरुजा हा 28 वर्षीय तरुण इंजिनिअर असून त्याने ही टोळी तयार केली होती. त्यांनी देशातील अनेक राज्यात आणि राज्यांतर्गत अनेक शहरात अनेकांना गंडा घातला आहे. रॉबीन आरुजासह किरण बनसोडे, रॉकी कर्ण, नवीन सिंह आणि अशोक यादव या पाच जणांना बेडय़ा ठोकून पोलिसांनी त्यांच्याकडून लाखोचा ऐवज हस्तगत केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com