उन्हाचे चटके असह्य! सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात तापमानाचा उच्चांक

उन्हाचे चटके असह्य! सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात तापमानाचा उच्चांक

चंद्रपूर शहरातील नागरिकांची वाढत्या तापमानाने लाहीलाही सुरु आहे.

अनिल ठाकरे | चंद्रपूर : चंद्रपुरातील उन्हाळा साऱ्यांनाच नकोसा. जगातील सर्वाधिक उष्ण शहर अस ठळक अक्षरात चंद्रपूर शहराचं नाव कोरले गेले आहे. शहर इतक उष्ण का? याचे अनेक कारणे. मात्र या उष्ण शहरातील नागरिकांची वाढत्या तापमानाने लाहीलाही सुरु आहे.

उन्हाचे चटके असह्य! सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात तापमानाचा उच्चांक
शरद पवार यांचे उद्धव ठाकरेंनी पाय पकडले : रवी राणा

मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपूर येथील तापमान 40 अंश सेल्सिअसचा वर गेले आहे. 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली आहे. बुधवारला राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरात झाली होती. मंगळवारपासून तापामान वाढत चाललं आहे. एरवी दिवसभर धावत असणार शहर दुपारच्या वेळी ओस दिसू लागलं आहे. तापमानापासून बचाव करण्यासाठी शहरवासी विविध उपाययोजना अंमलात आणताना दिसत आहेत. थंड पदार्थांची मागणी वाढली आहे. पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यामुळं उन्हाचा चटक्यापासून तूर्तास शहरवासियांची सुटका नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com