पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘या’ महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘या’ महिन्याच्या ‘मन की बात’ची वेळ बदलली

Published by :
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बातचा ८५ वा भाग येत्या रविवारी म्हणजेच ३० तारखेला प्रसारीत होणार आहे. मात्र या कार्यक्रमाची वेळ बदलली आहे. सकाळी ११ ऐवजी या रविवारी हा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता प्रसारीत होणार आहे.

३० जानेवारीला महात्मा गांधीजींची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

या महिन्याच्या ३० तारखेला मन की बात हा कार्यक्रम प्रसारीत होईल. मला खात्री आहे तुमच्याकडे सांगण्यासारख्या अनेकांच्या आयुष्यातल्या प्रेरणादायी कथा असतील. त्या आमच्याकडे पाठवा. नमो अॅपवरही तुम्ही विषय सुचवू शकता, असं ट्वीट काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओची सर्व केंद्रे, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारीत केला जातो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com