BJP - Shivsena
BJP - Shivsena

BJP - Shivsena : राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती फिस्कटली

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(BJP - Shivsena ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आले.

अनेकांना उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. काल अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचे देखील पाहायला मिळाले. यातच राज्यातील एकूण 15 महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटल्याचे पाहायला मिळाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळत आहे.

शेवटपर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं युतीबाबत दुमत असून शेवटपर्यंत दोन्ही पक्षांचं नेत्यांचं युतीबाबत एकमत होऊ शकलं नाही. 15 महापालिकांमध्ये युती तुटल्याचं सध्याचं चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, जालना, पिंपरी-चिंचवड, लातूर या शहरांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली आहे.

Summery

  • 15 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये बिनसलं

  • अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

  • शेवटपर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं युतीबाबत दुमत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com